राज्यातील सरकारी कामकाज होणार ठप्प, सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर

टीम महाराष्ट्र देशा : सरकारने सातव्या वेतन आयोग देण्याबाबत वारंवार टाळटाळ केल्याच सांगत राज्य सरकारी कर्मचारी उद्या ( दि 6) पासून संपावर जाणार आहेत, आज झालेल्या कर्मचारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून कायम आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. मागील आठवड्यात 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी संपावर जाण्याचा इशारा राज्यातील प्रमुख कर्मचारी संघटनाकडून देण्यात आला होता.

दरम्यान, सरकारला इशारा देऊन देखील कोणताही तोडगा काढण्यात न आल्याने अखेर तीन दिवसीय संपावर जाण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. या संपामध्ये मंत्रालयीन कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, सरकारी शाळांचे शिक्षक सहभागी होणार आहेत.