निवडणूक आयोगाकडे शिवसेनेने केली थेट भाजपाची नोंदणी रद्द करण्याची मागणी

sanjay-raut

टीम महाराष्ट्र देशा- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पाच वर्षांत न केल्यास राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. हाच धागा पकडत शिवसेनेने थेट भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी १०१ आश्वासने दिली होती. पण यातील एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नसून सर्वात आधी निवडणूक आयोगाने भाजपाची नोंदणीच रद्द करावी, अशी मागणीखासदार संजय राऊत यांनी केलीआहे. राऊत यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपावर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?
‘जर राज्य निवडणूक आयोगाने आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर याची सुरुवात त्यांनी भाजपापासून करायला हवी. भाजपाने निवडणुकीत १०१ आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी यातील एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही’.

शिवसेनेने मराठी बाणा दाखवत सत्तेतून बाहेर पडावे – अशोक चव्हाण

संसदेत अविश्वास ठराव : शिवसेना तटस्थ ; चर्चांना पूर्णविराम

‘चाणक्य असेही म्हणाला होता’ ; संजय राऊतांचा अमित शहांना टोला