राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला ; हिवाळी अधिवेशनानंतर होणार विस्तार

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे डोळे लागले आहेत. हिवाळी अधिवेशना आधी हा विस्तार होईल अस बोललं जात होत परंतु काल रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या तीन तासांच्या खलबतानंतर हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

bagdure

काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे मंत्री आणि नेते उपस्थित होते. तब्बल तीन तास चालेल्या या बैठकीत नारायण राणे यांच्या समावेशाबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.

You might also like
Comments
Loading...