राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार महिना अखेरीस होणार ?

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार ऑक्टोबर अखेरीस होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या विस्तारात नारायण राणे यांच्याबरोबरच शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी जोरदार चर्चा आहे .

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच काँग्रेसमधून बाहेर पडत स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडत असताना नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात महत्वाचे खाते दिले जाईल असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून देण्यात आले होते. हे आश्वासन आता पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाजप वर्तुळातून सांगितले जात आहे .

Loading...

काही दिवसांपूर्वी म्हाडा च्या पुनर्वसन योजनेप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते . विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मेहता यांच्यावरील आरोपांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात मोठा गोंधळ करीत मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती . त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती . मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतरच विरोधक शांत झाले होते . लोकायुक्तांनी मेहता च्या चौकशीचा अहवाल सहा महिन्यात द्यावा असे सांगण्यात आले होते . या चौकशीचे काय झाले या संदर्भात कसलीच माहिती अजून मिळालेली नाही. मात्र लोकायुक्तांचा अहवाल येण्या अगोदरच मेहता यांची गच्छंती केली जाईल असे सांगण्यात येते . प्रकाश मेहता यांच्याकडील गृहनिर्माण खाते नारायण राणे यांना दिले जाईल असेही सांगण्यात येते आहे . शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आ. विनायक मेटे यांनाही राज्यमंत्री केले जाईल अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात सुरु आहे . आ. मेटे यांच्याकडे सध्या शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद आहे. त्यांनी अनेकवेळा मंत्रीपदाची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी यावेळी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद