स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘या’ सेवा काही काळासाठी राहणार बंद

sbi

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया वेळोवेळी आपल्या ग्राहकांना महत्त्वपूर्ण सूचना सांगत असते. नुकतेच भारतीय स्टेट बँकेने काही कारणास्तव होणाऱ्या परिणामाबाबत माहिती दिली आहे. बँकेची सेवा मेंटेनन्ससाठी बंद असते तेव्हा देशातील लाखो ग्राहकांवर त्याचा परिणाम होत असतो, हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या बँकिंग व्यवहारांचं नियोजन करण्याची विनंती स्टेट बँक ऑफ इंडियाने केली आहे.

बँकेच्या ऑनलाईन प्रणालीत काही बदल करण्यासठी आणि काही त्रुटी दूर करण्यासाठी आज 15 सप्टेंबर रोजी हा मेंटेनन्स ब्रेक घेण्यात येणार आहे. या वेळात बँकेचे सर्व ऑनलाईन व्यवहार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाची सेवा बंद राहणार आहे.

यापूर्वी गेल्या महिन्यातही स्टेट बँक ऑफ इंडियानं मेंटेनन्स ब्रेक घेतला होता. 16 जुलै आणि 17 जुलै या दोन दिवशी स्टेट बँक ऑफ इंडियानं मेंटेनन्स ब्रेक घेतला होता. यामुळे काही तास बँकेचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता आज 15 सप्टेंबरला मध्यरात्री एसबीआयकडून मेंटेनन्स ब्रेक घेतला जाणार आहे. ग्राहकाच्या होणाऱ्या  गैरसोयबाबत बँकेकडून आधीच हि बाब सांगण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या