…अन्यथा १ जानेवारीपासून तुमचे बँक खाते बंद होणार

टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही जर भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयचे खातेदार असाल तर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी ३१ डिसेंबर पर्यंत आधार कार्ड लिंक करून घ्या अन्यथा १ जानेवारीपासून तुमचे खाते बंद केले जाणार असल्याची माहिती एसबीआयने ट्वीट करून दिली आहे. त्यामुळे एसबीआय मध्ये तुमचे खाते असेल तर या वर्षअखेर म्हणजेच ३१ डिसेंबर पर्यंत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेण्यास विसरू नका.

एसबीआयने काय म्हंटल आहे ट्वीट मध्ये

डिजीटल लाईफचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे खाते लवकरात लवकर आधारशी लिंक करावे लागेल. यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. जे ग्राहक ३१ डिसेंबरपर्यंत खाते आधारशी लिंक करणार नाहीत त्यांचे खाते १ जानेवारीपासून बंद केले जाईल.

मोबाईल द्वारे आधार बँक खात्याशी कसे लिंक करावे जाणून घ्या
आधी मोबाईलच्या मेसेज बॉक्स जा. यात UID<SPACE>आधार नंबर<SPACE> खाते नंबर

उदाहरणार्थ : UID २३४५६४५६६ ७६३६७७३५६६७

आता आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरुन हा मेसेज ५६७६७६ या नंबरवर पाठवा. मेसेज सेंड झाल्यानंतर काही वेळाने बँक खात्याशी आधार लिंक करण्याबाबतची सूचना मेसेजद्वारे तुम्हाला मिळाले. या पद्धतीने तुम्ही बँख खाते आधारशी लिंक होईल.