fbpx

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ATM मधून आता कितीही वेळा काढा पैसे

state bank of india

टीम महाराष्ट्र देशा : स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकाना एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी अनेक नियम लागू होते. त्यामुळे एटीएम कार्ड धारकांची गैरसोय होत होती. परंतु आता एटीएमकार्ड धारकांसाठी महत्वाची घोषणा बँकेने केली. यानंतर स्टेट बँक एटीएम कार्ड धारक कितीही वेळा एटीएम मधून पैसे काढू शकणार आहेत. फक्त यासाठी बँकेच्या काही नियमांचे पालन करावे लागणार आहेत.

काय आहेत बँकेचे नियम ?

कितीही वेळा पैसे काढण्यासाठी तुमच्या बँक खात्यात सरासरी १ लाख रुपये असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला याचा फायदा घेता येणार आहे.