मोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी आज दुपारी मंत्रालयात जाऊन मुख्य सचिव डी. के जैन यांची भेट घेतली. त्यांनतर आयोगाच्या सदस्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा अहवाल डी. के. जैन यांच्याकडे सादर केला. यावेळी डी. के. जैन म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून यावर अभ्यास करुन पुढील निर्णय घेण्यात येईल.

Rohan Deshmukh

मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल गोपनिय असला तरी त्यात मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे आयोगाला मिळालेल्या निवेदनांमध्ये राज्यातील इतर समाजांनीही मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले आहे.

मुख्य सचिव हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारीच अहवालावरील सर्व प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...