ऐतिहासिक भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात

root and kohli

टीम महाराष्ट्र देशा : आजपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ उत्तम प्रदर्शन करेल असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले आहे. आज पासून या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून या सामन्यांसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

इंग्लंडचा हा १००० वा कसोटी सामना आहे, पण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ त्यांच्या आनंदावर विरजण घालू शकतो. भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती.

कसोटी मालिकेपूर्वी उत्तम सराव व्हावा म्हणून भारताने ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेचे आयोजन आधी केले. त्यानंतरही इंग्लंडमधील स्थानिक संघ इसेक्सशीही तीनदिवसीय सराव सामना खेळून स्वत:च्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंची चाचपणी केली. तेव्हा इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर खेळण्यासाठी भारतीय फलंदाज किती सक्षम आहेत, याचे उत्तर लवकरच मिळेल. दुसरीकडे कर्णधार जो रूट स्वत: फॉर्मात असून त्याला अनुभवी अॅलिस्टर कुक, युवा किटॅन जेनिंग्स, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो कसे साथ देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कुक, किटॉन जेनिंग्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), मोईन अली, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम कुरान.

सामन्याची वेळ : दुपारी ३:३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३

भारत व श्रीलंका कसोटी: भारतीय फलंदाजांची हुकूमत