आजपासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात, सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : फडणवीस सरकाचे अखेरचे अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात शेतकरी, बोरजगारी, दुष्काळ अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या मुद्द्यावर विरोधक आक्रमक भूमिका घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्य अनेक खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आली. यानंतर विरोधक प्रश्न उपस्थित करण्याची चिन्हे आहेत. सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे.

अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखण्यात आली. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुंडे म्हणाले की, भ्रष्ट मंत्र्यांना राज्यातील जनता येत्या अधिवेशनात वगळल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी दुष्काळ, बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवर आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट केलं. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात राज्यात आहेत. त्यामुळे बेरोजगार भत्ता राज्यातील तरुणांना द्यावा अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत असं सांगितले.