छिंदमच्या हकालपट्टीनंतर नवीन उपमहापौरांचा शोध सुरु

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची महापालिकेतून हकालपट्टी करण्यात आली. अहमदनगर महापालिकेत छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तसेच छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला. दरम्यान, उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आजपासून दि २७ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नगरसचिव कार्यालयात अर्ज उपलब्ध असून तेथेच स्वीकारले जाणार आहेत. सभा सुरू झाल्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर अर्ज परत घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. उपमहापौर पदाच्या निवडणूकीचा ५ मार्च रोजी होणारा कार्यक्रम अधिकारी अभय महाजन यांनी जाहीर केला. मनपातील राजकीय वातावरणात तापले असून उपमहापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like
Comments
Loading...