पिंपरी शहालीमधे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ

नेवासा: तालुक्यातील पिंपरी शहालीमध्ये लक्षिमन महाराज नवथर (विठ्ठल रुख्मिणी संस्थान) या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. अनंत कृपासिन्धु रामभक्त हनुमंत रायाच्या व भगवान पांडुरंग परमात्मयाच्या कृपा आशीर्वादाने महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज (देवगड संस्थान), शिवाजी महाराज देशमुख, लक्षिमन महाराज नवथर यांच्या प्रेरणेने तसेच बाळासाहेब महाराज नवथर याच्या मार्गदर्शनानुसार या सप्ताहाचे आयोजन तथा संत शिरोमणी नामदेव महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे. परायणाचे नेतृत्व साहेबराव महाराज माताडे आणि प्रभाकर महाराज जीवडे यांच्याकडे आहे.यावेळी चवथ्या दिवशी कीर्तनाचे पुष्प हरी भक्त पारायण डमाळ महाराज तळणीकर यांनी गुंफलेलं आहे व प्रवचनाची सेवा ह.भ.प.भाऊसाहेब महाराज नवथर यांनी केली आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

यावेळी ,लक्षिमन महाराज नवथर,दादासाहेब माळवदे,भिमराज नवथर(सरपंच),भाऊसाहेब नवथर,रावसाहेब गुळमंकर,विष्णू नवथर,बारकू नवथर(टेलर),भाऊसाहेब नवथर,हनुमान पाटील जगदाळे,दत्तात्रय गुंड,प्रकाश नवथर,साहेबराव महाराज चावरे,सोमनाथ महाराज नवथर,भाऊसाहेब नवथर,आसाराम भूमकर, बाळासाहेब महाराज नवथर,जगन्नाथ कचरे, देवा पवार, राजेंद्र लोखंडे, संभाजी वखरे, मधुकर देवा आदी उपस्थित होते.

Shivjal