पुणे लोकसभेच्या जागेवरून आघाडी मध्ये रस्सीखेच सुरुच

congress ncp

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आघाडीकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. काल दिवसभर बहुचर्चित असलेली पुणे लोकसभा जागा आता कॉंग्रेसच लढणार असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर रंगल्या होत्या मात्र या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Loading...

पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने सुद्धा आपला हक्क सांगितला असून त्याचाच एक भाग म्हणून गेले काही दिवस पुण्याचा जागे वरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपावर मुंबई मध्ये झालेल्या बैठकी मध्ये ही जागा कॉंग्रेसला कायम राखण्यात यश आल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली होती. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागावर एकमत झाले असून 8 जागांवर चर्चा सुरू आहे. तर कालपासून पुण्याची जागा काँग्रेसला सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. मात्र त्या बातम्यामध्ये काही तथ्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कडून अनेकजण लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  अजित पवार यांनी पुण्याची जागा कॉंग्रेसला सोडल्याच्या वृत्ताच खंडन केल्यामुळे आगामी काळात पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने येणार हे स्पष्ट झालं आहे.

नगर , रत्नागिरी – सिंधुदुर्ग , नंदुरबार , यवतमाळ, औरांगावाद आणि रावेर या सहा जागांवरून अद्याप दोन्ही पक्षात मतभेद आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या सोबत आघाडीने जागा वाटपावर आज चर्चा सुरु असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.Loading…


Loading…

Loading...