100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करा, अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने २५ सप्टेंबर दिवशीच्या बैठकीत घेतला. येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्यात येणार असून या नियमामध्ये काही बदल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

राज्यात २२ ऑक्टोबरपासून थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.  मात्र  यामध्ये बदलकरून थिएटर 100 टक्के क्षमतेनं सुरु करा कारण 50 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना परवडणारं नाही, कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घ्या, असे म्हणत 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करण्यास अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे मागणी केली आहे. 50 टक्के क्षमतेनं थिएटर खुले करण्याचा निर्णय व्यवसायिक दृष्ट्या योग्य नसल्याचे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंटन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या