आरोग्य योजनांसाठी माहिती केंद्र सुरू करा – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

सांगली  : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा. या योजनांचा लाभ अधिकाधिक रूग्णांना व्हावा, यासाठी प्रयत्न करा. जे रूग्ण या योजनेतील निकषात बसत नाहीत, त्यांच्यासाठी आरोग्य केंद्राची उभारणी करून पक्षीय पातळीवर मदत करा. भविष्यातही एकही नागरिक आरोग्य सुविधा व मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या सभागृहात आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. सद्यस्थितीत आरोग्य सेवा दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. अचानकपणे एखादा गंभीर आजार उदभवल्यानंतर खर्चाचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. अशा व्यक्तींना केंद्र अथवा राज्य शासनाच्या योजनाही माहित नसतात. माहित असतील, तर काही अटीमुळे त्यांचा लाभही घेता येत नाही. त्यामुळे पूर्वीच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील जाचक अटी रद्द करून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. यात नव्याने अनेकविध आजारांचा समावेश करण्यात आला आहे. वयोवृध्द नागरिकांना त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रियाही या योजनेतून मोफत करता येणार आहे.

Loading...

या योजनेआधारे सर्वसामान्यांच्या आरोग्य समस्या अधिकाधिक सोडविण्याचा प्रयत्न आहे. या योजनेत एखादा आजार बसत नसेल, तर भाजप नेत्यांनी पक्षीय पातळीवर संबंधित रूग्णाची मदत पदरमोड करून करावी. कोणीही पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी. आवश्यकता भासल्यास कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही आरोग्यविषयक संपूर्ण माहिती देणारे केंद्र सुरू करावे. त्याठिकाणी २४ तास वैद्यकीय अधिकारी कार्यान्वित ठेवावा. त्या अधिका-यांमार्फत संबंधित रूग्णाच्या उपचाराबाबतचा संपूर्ण पाठपुरावा करावा. केवळ आरोग्य शिबिर घेऊन चालणार नाही, तर दीर्घकालीन आरोग्य यंत्रणा उभी करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील