‘मंदिरे, देवस्थाने सुरु करुन त्यात मर्यादित संख्येने भजन-किर्तन, पूजा-अर्चना करण्याची परवानगी द्या’

मुंबई : कोरोना संकटकाळाचे लॉकडाऊन (टाळेबंदी) हटवून आपण राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू केले आहे. या मिशन बिगिन अगेन मधे बाजारपेठा काही निर्बंधांअधिन राहून हळू हळू सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे शहरांतर्गत व राज्यातील बस प्रवासी वाहतुकही टप्प्या टप्प्याने सुरू होत आहे.

नुकताच राज्य सरकारने हॉटेल आणि उपाहारगृहे काही निर्बंधांतर्गत सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महिन्याभरापूर्वीच परवानगी दिलेली असल्याने “पुनश्च हरि: ओम” अभियानांतर्गत प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून मंदिरे , देवस्थाने सुरु करुन त्यात मर्यादित संख्येने भजन- किर्तन, पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळावी याबाबत आज महामहिम राज्यपाल यांची भेट घेऊन विनंती केली.

महाराष्ट्रातील अनेक आध्यात्मिक संघटनांच्या वतीने एक शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटले. यात भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, अ.भा.संन्यासी संप्रदायातर्फे स्वामी विश्वेश्वरानंद जी सहभागी होते. अखिल भारतीय संत समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद, जय बाबाजी भक्त परिवार, विरशैव लिंगायत संप्रदाय, आदि. अनेक प्रमुख संघटनांनी शिष्टमंडळामार्फत आपली निवेदने सादर केली.

दरम्यान, भारतीय समाज हा देवाधर्माभोवती बांधला गेलेला आहे. आज या संकटकाळात समाजाला भावनिक धार्मिक आधाराची देखिल खरी गरज आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात बंद करण्यात आलेली सर्व देवस्थाने सामाजिक आंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करत तातडीने उघडण्याची गरज आहे. त्यातून समाजाला मोठा मानसिक आधार मिळेल. त्यामुळे समाजासाठी बंद केलेली सर्व देवस्थाने योग्य ती काळजी घेत तातडीने उघडावीत अशी विनंती मुंबई भाजपातर्फे करण्यात आली आहे.

बळीराजा संकटात; बोगस बियाणांच्या हजारो तक्रारी

‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार – अजित पवार

नोव्हेंबरअखेरपर्यंत कोरोना संपेल, हसन मुश्रीफांचा दावा

IMP