‘कोरोनामुक्‍त गावात शाळा सुरु करा’ ; पोपटराव पवारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

popatrav pawar

अहमदनगर : कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या गेल्या अनेक दिवसांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पद्मश्री पोपटराव पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जी गावे, वाडया, वस्त्या व पाडे यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच ज्या गावात कोरोना आला परंतु उत्तम नियोजनातून कोरोना मुक्त गाव करण्यात आली अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या संबिधीत विभागामार्फत परिस्थितीची खातरजमा करून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

हिवरे बाजार हे राज्यातील पहिले कोरोनामुक्त गाव झाले असून त्याच अनुभवातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी,पालक,शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर 15 जून 2021 पासून इयत्ता 5 ते 7 वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व 8 ते 10 यशवंत माध्यमिक विद्यालय सुरु केले आहे.त्यामुळे विद्यार्थी आनंदी आहेत. तसेच गेल्या 8 दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

आपल्याला कोरोना बरोबरच रहायचे आहे हे लक्षात आल्यामुळे प्रथमतः शिक्षकांची व त्यानंतर पालकांची व ग्रामपंचायत कोरोना सुरक्षा समितीची बैठक घेऊन हिवरे बाजार येथील विद्यार्थी, पालक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी कोरोनाविषयक जबाबदारी स्वीकारली आणि शिक्षकांनी अध्यापनाचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP