अमरावतीतील श्रमिकांच्या रोजगाराचे साधन नियमित सुरु करा, केंद्रीय मंत्र्यांची मागणी

navnit rana

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर- परतवाडा येथे असणारी फिनले मिल येथील श्रमिकांच्या रोजगाराचे एकमेव साधन आहे. कोरोना महामारीमुळे केंद्र व राज्य सरकारने मार्च महिन्यात घोषित केलेल्या टाळेबंदीपासून मिलचे उत्पादन थांबविण्यात आले आहे.

कामगारांना अत्यल्प वेतन मिळत आहे. इतक्या कमी पैशात घर चालविणे शक्य नसल्याने कामगारांनी मिल सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. याच मागणीला पाठींबा घोषीत करून खा. नवनीत राणा यांनी गुरूवारी दिल्ली येथे केंद्रीय वात्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन मिल त्वरित सुरू करण्याची मागणी केली.

विदर्भातील नागपूर-यवतमाळ-अमरावती येथील कापड उद्योग सुरू झाला असून केवळ फिनले मिल बंद असल्याचे त्यांनी इराणी यांच्या लक्षात आणून दिले.फिनले मिल हा केंद्र सरकारचा ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट असूनही बंद आहे. सदर मिल तात्काळ सुरू करावी व कामगारांचे थकीत वेतन एकरकमी देण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली. सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे या आंदोलना दरम्यान सुनील कावरे व अंकित कामविसदार या 2 कामगारांचा मृत्यू झाला.

या दोन्ही कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लक्ष रुपये मदत द्यावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी मागणी सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी केली. केंद्रीय मंत्री इराणी यांनी सकारात्मक पाऊले उचलून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे अभिवचन दिल्याचे खासदार नवनीत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-