‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात

पुणे : संगीत प्रेमी कलाकार व रसिकांचे जणू तीर्थस्थान असणाऱ्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सुरुवात जेवढी दमदार होते तेवढाच समारोपही हजारो रसिकांच्या साक्षीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावलेला असतो. आज ’६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरुवात अशीच भारावलेल्या सुरेल वातावरणाने झाली.

आजची सुरुवात ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग शुद्ध सारंगने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यांनी विलंबित एक तालातील ‘आइये सब मिल देवो मुबारक बतीया…’ ही रचना सादर करून मध्यलय अध्धा तीन तालातील ‘अब मोरी बात…’ ही रचना व नंतर पं. बळवंतराय भट यांच्या ‘भावरंग’ मधील द्रुत तीन तालातील ‘दीर दीर दीर तानोम…’ हा तराणा पेश केला व रसिकांची दाद मिळवून गेला. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेला अभंग ‘अवघाची संसार सुखाचा करीन…’ या अभंगाने त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), निरंजन लेले (हार्मोनियम), भक्ति खांडेकर, वालीराज लिमये व सुधांशू मणेरीकर (ताणपुरा), माऊली टकाळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.

Loading...

त्यानंतर पं. उल्हास कशाळकर यांच्या शिष्या रुचिरा केदार यांचे गायन झाले. त्यांनी राग गौडसारंगने गायनाची सुरुवात केली. यात विलंबित तीन तालातील ‘सैया मे तो…’ ही पारंपरिक बंदिश व द्रुत तीनतालातील ‘पिहू पालन लागी मोरी अखिया…’ ही बंदिश त्यांनी पेश केली. त्यानंतर राग पटदीप मध्ये ‘ए होरी खेलत बिहारी…’ ही रचना व तराणा पेश केला. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अजिंक्य जोशी (तबला), नित्या शिकारपूर व कस्तुरी जोशी (तानपुरा) यांनी साथासांगत केली.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार