‘बदल्यांतून कमावलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरू करा’, खा.विखेंचा थोरातांना टोला

अहमदनगर : सध्या राज्याचे महसूलमंत्री नगर जिल्ह्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावर भाजप खासदार सुजय विखेंनी टीका केली आहे. ‘मंत्री कोरोनाच्या बैठकांमध्ये ऑक्सिजन, रेमेडसिविर इंजेक्शनचा आढावा घेतात. त्यापेक्षा या मंत्र्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत कमवलेल्या पैशांतून कोविड सेंटर सुरू करावेत. शासनाच्या पैशांतून सुरू केलेल्या कोविड सेंटरवर केवळ आपल्या पाट्या लावू नयेत, असा टोला विखे यांनी थोरात यांचे नाव न घेता मारला.

श्रीगोंदे तालुक्यातील लोकसहभागातून सुरू केलेल्या कोळगाव, पिंपळगाव पिसा, घारगाव, लोणी व्यंकनाथ व मढेवडगाव येथील कोविड सेंटरला व काष्टी येथील ऑक्सिजन प्रकल्पाला खासदार सुजय विखे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील सर्व कोविड सेंटरना औषधासाठी प्रत्येकी ५० हजारांची मदत केली.

कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून कोविड सेंटर सुरू केले ही आनंदाची बाब आहे. इतर तालुक्यांतही अशी सेंटर सुरू झाली तर उपचारांसाठी शहरांत जाणाऱ्या रुग्णांचा लोंढा थांबेल, असे विखे म्हणाले. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप उपस्थित होते.

दरम्यान, रेमडेसिवीरच्या साठ्यावरून भाजपवर टीका होत असतानाच अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणलेत. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे. मात्र, यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP