‘स्वाराती’त आणखी एक ऑक्सिजन प्रकल्प सुरू करा, आ.नमिता मुंदडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरपैकी अजूनही ८ व्हेंटिलेटर ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे वापरण्यात येत नाहीत. हे व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी या परिसरात आणखी एक ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सध्या कोविड रुग्णांसाठी दोन आयसीयू वॉर्ड आहेत. दोन्ही वॉर्डमध्ये ३२ बेड आहेत. परंतु, सध्या फक्त २४ व्हेंटिलेटरच चालू आहेत. आणखी ८ व्हेंटिलेटर उपलब्ध असूनही ऑक्सिजन पुरत नसल्यामुळे बसवले नाहीत. ऑक्सिजन प्रेशर नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी अडचण येत आहे, असे समजते.

सध्या आयसीयू बेड आवश्यक असलेले रुग्णसंख्या जास्त आहे. परंतु, बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार होत नाहीत. रुग्णांचे नातेवाइक डॉक्टर्स हतबल होताहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनास वारंवार सांगूनही कार्यवाही होत नाही. आयसीयू बेड व्हेंटिलेटरसहित वाढवण्याबाबत वारंवार सूचित केल. तरी यावर कायमस्वरूपी मार्ग काढून आयसीयू बेड व्हेंटिलेटरसहित वाढवण्याबाबत आदेश द्यावे. अशी मागणी आमदार मुंदडांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP