७ /१२ उताऱ्याचे ऑनलाइन संकेत स्थळ तात्काळ सुरु करा : शिवप्रताप युवा प्रतिष्ठान

करमाळा : शिवप्रताप युवा प्रतिष्ठानच्या वतीने ऑनलाइन सात बारा उतारा मिळण्याचे संकेत स्थळ तात्काळ सुरु करा या मागणीचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले. शिवप्रताप युवा प्रतिष्ठानने या निवेदना मध्ये म्हटले आहे की, ऑनलाइन सात बारा उताऱ्याचे संकेत स्थळ गेल्या दीड दोन महिन्या पासुन बंद आहे. त्यामुळे, पिक कर्जासाठी तसेच इतर शासकीय कामासाठी सातबारा उतारा काढणे, फेरफार करणे, नोंदी लावणे यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

ऑनलाइन संकेत स्थळ चालु असताना नेटकॅफे मध्ये दहा रुपायत साता बारा उतारा मिळत होता. परंतु सध्या फक्त तलाट्यांच्या डोंगल वरच उतारे उपलब्ध होत असल्याने तलाठी सातबारा उताऱ्यासाठी चाळीस रुपये घेत आहेत. तसेच शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या दारात दिवस दिवस ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही बाजुने नुकासान होत आहे.

Loading...

तरी लवकरात लवकर ऑनलाइन संकेत स्थळ सुरु करावे, अन्यथा शिवप्रताप युवा प्रतिष्ठानच्या वतीने शंखनाद अंदोलन करण्याचा ईशारा तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आलेल्या निवेदना द्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर शिवप्रताप युवा प्रतिष्ठानचे संस्थापक शंभुराजे फरतडे जिल्हा अध्यक्ष ओंकारराजे निंबाळकर, तालुका अध्यक्ष महेश काळे पाटिल, केम येथील दत्ता तळेकर, नेरले येथील राहुल पोळ ,विपुल पोळ, मोरवड येथील आदेश राऊत, हिवरे येथील राघु काळे, नवनाथ फरतडे मोतीराम फरतडे, विट येथील बिभिषन ढेरे, संजय जाधव ,दत्ता धोत्रे, काका काकडे, नंदु कांबळे, उमरड येथील विलास बदे, विट्ठल बदे ,संजय कोठावळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवसात संकेत स्थळ सुरु करु

दरम्यान, ऑनलाइन संकेत स्थळ बंद असल्याने शेतकरी बांधवाची अडचण होत आहे. लवकरात लवकर संकेत स्थळ सुरु करण्याची आम्ही मागणी केली आहे. तुमचे निवेदन देखील पाठवले जाईल, दोन दिवसात संकेत स्थळ सुरु होईल असे आश्वासन तहिसलदार संजय पवार यांनी दिले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर