‘नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी माझ्या पाठीशी उभे रहा’, रावसाहेब दानवेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

RAOSAHEB DANVE

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन संदर्भात दानवे यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली. यावरच मंत्री दानवे यांनी आपल्या स्टाईलमध्ये मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले.

मुख्यमंत्री महोदय तुम्ही नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी फक्त माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं पुढं मी बघतो, मी पंतप्रधान मोदींना याविषयी कळवेल की, मुख्यमंत्री आपल्या पाठीशी असून आपणही रेल्वेसाठी मदत करत पुढाकार घ्यावा. असे मंत्री दानवे यांनी म्हटले आहे. ते जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आज बोलत होते.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. किंवा भरकटत नाही. रुळ सोडून इंजिन इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता’. त्यामुळे आपल्या कामात गती हवी. मी विना प्रेजेंटेशन या प्रकल्पाला सोबत असणार फक्त तुम्ही यासाठी पुढाकार घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केली. तर राज्याच्या आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आपण साथ देणार असल्याची ग्वाही मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या