मुद्रांक व नोंदणी शुल्क आकारणी संदर्भात मुल्यदर तक्ता करण्यासाठी मंगळवारी बैठक

सांगली : मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क आकारणीसाठी वापरण्यात येणारे बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी नव्याने तयार केले जातात. सन २०१८-१९ चे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. हे बाजार मूल्यदर तक्ते वास्तववादी व पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक संचालक नगर रचना पुणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. वार्षिक मुल्य दर तक्ते तयार करण्याच्या अनुषंगाने जर कोणास काही म्हणणे मांडावयाचे असल्यास निवेदनासह उपस्थित रहावे किंवा लेखी म्हणणे द्यावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-१ यांनी केले आहे.