डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक

aurangabad vidapathat

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग मंझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. ईश्वरसिंग मंझा यांनी महाविद्यालयात शिपाई ची नोकरी लाऊन देतो म्हणून ३ लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी फसवणूक केल्याची तक्रार त्यांच्या विरोधात दाखल आहे.

उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग मंझा यांनी महाविद्यालयात शिपाई ची नोकरी लाऊन देतो म्हणून ३ लाख रुपये घेतले होते. मात्र नोकरी लागली नाही. तसेच मंझा यांना दिलेली रक्कम परत मागितली असता. त्यांनी दोन दोन वेळा चेक दिले. मात्र ते चेक पास झाले नाहीत. अशी तक्रार चिकलठाण येथील देवराव चव्हाण यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिवांना अटक करण्यात आली आहे. उपकुलसचिवांनाच अटक झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधान आलं आहे.