मुंबई : कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन केले. बंगल्यावर दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या आंदोलनामागे नक्की कोणाचा हात होता हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
याच मुद्द्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे असे म्हणत या प्रकरणाचा तपास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सक्षमपणे करून दोषींवर कडक कारवाई करतील, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या –