एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार?; आजच्या बैठकीत होणार निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार?; आजच्या बैठकीत होणार निर्णय

अनिल परब

मुंबई : राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास महिनाभरापासून सुरुच आहे. एसटीचे सरकारमध्ये विलिनिकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यासह शेकडो एसटी कर्मचारी मागील १५  दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. इतके दिवस होऊन गेले तरी देखील या संपावर तोडगा काढण्यात आलेला नाही.

राज्य सरकार आणि एसटीचे संपकरी या दोघांमध्ये झालेल्या कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासोबत चर्चा झाली. वेतन वाढ, वेळेवर वेतन मिळण्यासाठी कर्मचारी राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी करत आहेत.

पण उच्च न्यायालयाने समिती नेमली असून त्यांच्यासमोर हा विषय देण्यात आला आहे. ही समिती १२ आठवड्यांत आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन सरकार म्हणून मी आणि कामगार म्हणून ते करू शकत नसल्याचे देखील अनिल परबांनी (Anil Parab) स्पष्ट केले आहे.

कालची कर्मचाऱ्यांशी चर्चा सकारात्मक झाली असल्याचे देखील परिवहन मंत्र्यांनी सांगितले. तर आज सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा निर्णय घेण्यासाठी चर्चा होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे सध्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या