संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार

टीम महाराष्ट्र देशा: ऐन दिवाळीच्या काळात एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तब्बल चार दिवसांनी मागे घेतला होता. चार दिवस पुकारलेला संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानभरपाई बाबत नियमानुसार एका दिवसामागे आठ दिवस असा 36 दिवसांचा पगार कापला जाणार आहे. ही पगार कपात पुढील सहा महिन्यामध्ये वसूल केली जाणार आहे. या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाईल, तर उरलेल्या 32 दिवसांचा पगार पुढील सहा महिन्यात कापण्यात येईल.

दिवाळीच्या तोंडावर पुकारलेल्या संपामुळे एस टी महामंडळाचे मोठ नुकसान झाले होते त्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर चार दिवसांनी संप मागे घेण्यात आला होता. पण आता या निर्णयाविरोधात एस टी कर्मचारी औधोगिक न्यायलयात दाद मागणार आहेत.

Loading...