मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप; प्रवाशांचे हाल

मुंबई : राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली मात्र, ती फसवी असल्याने पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून, ते गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संपावर गेले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. संप काळात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. या संपाविषयी कोणताही पत्रव्यवहार न करता केवळ कामगार सेना वगळता सर्व संघटनांच्या कृती समितीने हा एल्गार पुकारला आहे.

कृती समितीच्यामागणीतील ३१ मार्च २०१६ च्या मुळ वेतनात दिलेल्या सुत्राप्रमाणे २.२७ टक्केचे सुत्र मान्य झाले. सर्व कर्मचाऱ्यांना ३२ टक्के ते ४८ टक्के वेतवाढीचा दावा केला परंतू १७ ते २५ टक्के पर्यंतच वाढ होत असल्याने ही घोषणा फसवी असल्याचा आरोप कृती समितीने करून अचानक संप पुकारला आहे. आता शासनाची कोंडी होणार आहे. त्या अनुशंगाने सर्व ठिकाणच्या विभागीय कार्यालयात बैठका झाल्या असून गुरवारी मध्यरात्रीपासून हे सर्व कर्मचारी संपावर आहेत.Loading…
Loading...