सुट्ट्या पैशाची कटकट मिटली, एसटीचा प्रवास आता कॅशलेस

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे लालपरी अर्थात एसटी. ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रवासाचा कणा असणाऱ्या एसटीमध्ये नेहमीच वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून खटके उडत असत मात्र आपल्या ७१ व्या वर्धापनदिनी लालपरीने कात टाकली आहे. एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीच्या ७१ व्या वर्धापनदिनी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्टकार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

Loading...

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील गोकुळदास तेजपाल सभागृहात एसटीचा ७१ वा वर्धापनदिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांसाठी तसेच एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी भरघोस योजना जाहीर केल्या.

एसटीसाठी सध्या इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नजिकच्या काळात एसटीच्या सर्व गाड्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) वर चालविण्यात येतील. यामुळे एसटीची सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार असून प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.Loading…


Loading…

Loading...