राज्यात उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद होत असताना एसटी वाहतूक होणार पूर्ण क्षमतेने!

St stand

मुंबई : देशात आता अनलॉक-४ लागू करण्यात आला आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे. गेले काही दिवस देशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ९० हजार पार गेला असून गेल्या २४ तासात उच्चांकी ९७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

तर ऑगस्ट महिन्यात राज्य परिवहन मंडळाची सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला सोशल डिस्टनसिंग तसेच आवश्यक खबरदारी घेऊन एसटी वाहतूक हि ५० टक्के प्रवाशांना घेऊनच केली जात होती. काल राज्य परिवहन मंडळाळासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार एसटी वाहतूक आज (दि.१८ सप्टेंबर) पासून पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. त्यामुळे एका बाजूला देशासह राज्यात उच्चांकी नव्या रुग्णांची नोंद होत असताना ही जोखीम कशाला? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. दरम्यान, प्रवासामध्ये प्रत्येकाला मास्क घालणे व सॅनिटायझर बाळगणे आवश्यक आहे. मास्क व सॅनिटायझर असल्यासच बस मध्ये प्रवेश दिला जाईल.

दुसऱ्याबाजूला राज्यात, काल तब्बल 24619 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर नवीन 19522 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून एकूण 812354 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सद्या एकूण ३ लाख १ हजार ७५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.90% झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :-