अखेर दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; प्रवाशांना दिलासा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन दिवसांनंतर मिटला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत एसटीच्या मान्यताप्राप्त संघटना आणि दिवाकर रावते यांच्यात काल बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली.”इतकी वर्षे पगार नव्हते तरी कामगार काम करत होते. आता पगार वाढ देऊनही संप केला. कामगारांनी या राजकारणात पडू नये,” असं आवाहन दिवाकर रावतेंनी यावेळी केलं. तसचं दोन वेळा संप करुनही कारवाई केली नाही, मेस्मा फाईलवर सही केली नाही, यापुढे असं पाऊल उचलू नये, असंही रावते म्हणाले.

”महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. ही वेतनवाढ करारामध्ये परावर्तित करण्यासाठी एसटी प्रशासन आणि संघटना यांनी बैठक घेऊन वेतनवाढ समजावून घ्यावी,” असं देखील रावते या वेळी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...