वारीसाठी एसटी महामंडळ सज्ज

टीम महाराष्ट्र देशा– आषाढवारीच्या निमित्ताने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेसाठी येणा-या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाठी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी २१ ते २८ जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे ८ हजार कर्मचारी सेवा देणार असून, या कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. या बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उदघोषणा आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पंढरपूर येथे बोलताना सांगितले.

एसटीतील अधिकाऱ्यांच्या कनिष्ठ वेतनश्रेणींचा कालावधी आता एक वर्ष

Loading...