VIDEO : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ; प्रवाशांचे प्रचंड हाल

टीम महाराष्ट्र देशा: ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

संपात मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील.

या आहेत प्रमुख मागण्या

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी

जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी

पहा व्हिडीओ 

#ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर एस टी कर्मचाऱ्यांचा संप प्रवाशांचे प्रचंड हाल तर कर्मचारी पगाराविना बेहाल

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 16, 2017