fbpx

एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतन करारात दुपटीने वाढ; रावतेंनी केल्या महत्वाच्या घोषणा !

rawte

मुंबई : परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली. तसेच वेतन करारात दुपटीने वाढ करत असल्याचे सांगितले.

दिवाकर रावते म्हणाले, शिवशाहीचं सरकार असताना 1996 ला 72 कोटींचा करार केला. सगळ्याच सरकारच्या कार्यकाळात दोन वर्षांपर्यंत करार रखडले. तरीही याच सरकारवर टीका करण्यात आली. पाप कुणाचं अन् ताप कुणाला अशी माझी अवस्था झाली. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार अनेक कारणांनी रखडला असल्याचं सांगत, आतापर्यंत झालेल्या सर्व वेतन करारांपैकी दुप्पट वाढ देणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.

रावते यांनी 2016 ते 2020 सालापर्यंत 4849 कोटींचा करार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. तसेच सातव्या वेतन आयोगाचं सूत्र वापरून 2.57 नुसार वेतनवाढ केली आहे. या वेतनवाढ कराराचा 47 हजार ते 50 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होईल. यासाठी 176 कोटी रुपयांचा भार महामंडळ स्वीकारत आहे.

कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय

  • कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतीबा फुले शिष्यवृत्ती योजनेद्वारे 750 रुपये प्रति महिना देणार, यासाठी 22 ते 23 कोटी खर्च करणार
  • निवृत्त कर्मचाऱ्यांना सवलतीचा पास दोन महिन्यांऐवजी सहा महिने वाढवण्याचा निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक शुल्कासाठी कर्मवीर भाऊराव पाटील अग्रीम बिनव्याजी कर्ज योजना
  • पाल्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी लागणारे खर्च एसटी महामंडळ देणार
  • शहीद पत्नींना मोफत पास आणि वारसांना नोकरी योजनेची आजपासून अंमलबजावण