औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!

औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षात जो लढा झाला नाही. तो लढा आता एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केला आहे. पगारवाढीच्या निर्णयानंतरही विलीनीकरण या मुख्य मागणीवर ठाम राहत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या माघारीनंतर कर्मचारी आणखी आक्रमक झाले असून आम्हाला पगारवाढ नको म्हणत संप मागे घेण्यास औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. या संपाचा आज सलग २० वा दिवस. मात्र अजूनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात महामंडळाला यश आलेले नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आम्हाला ही पगारवाढ नको असे म्हणत कर्मचारी विलीनीकरण या मुद्द्यावर अडून बसले आहेत.

एसटी संपाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने एसटी प्रशासनाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे. औरंगाबाद विभागात संपकरी कर्मचारी विभागातील संपकऱ्यापैकी केवळ ३८ कर्मचारी रुजू झाले आहेत. हे सर्व जण प्रशासकीय आणि मॅकॅनिक संवर्गातील आहेत. अद्याप एकही चालक रुजू झालेला नाही, त्यामुळे अद्यापही एसटी सुरु होऊ शकलेली नाही. शुक्रवारी सकाळी एक वाहक रुजु झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले मात्र अजूनही औरंगाबाद विभागातून एकही बस बाहेर धावलेली नाही.

खाजगी शिवशाहीच धावतेय

विभागात ७८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आली आहे. त्यापैकी आठ कर्मचारी कामावर परतल्याने त्यांचे निलंबन रद्द झाले आहे. दरम्यान विभागात ३८ कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी अद्याप एकही चालक रुजू न झाल्याने एसटी सेवा बंदच आहे. सध्या भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या शिवशाही पुणे मार्गावर धावत आहे. दररोज साधारण आठ खाजगी शिवशाही बसेस पुण्यासाठी रवाना होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या