एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रश्न सुटणार ? उद्या महत्वपूर्ण बैठक

टीम महाराष्ट्र देशा : एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पगारवाढीचा प्रश्नावर सोमवारी (२ एप्रिल) सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या जवळपास 21 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी मुंबईत दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे.

वेतनवाढ संदर्भात मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेनं ऐन दिवाळीच्या हंगामात चार दिवसांचा संप पुकारून कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. इतकंच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संघटनांच्या भूमिकांबाबत असलेला असंतोष पाहता, दोन एप्रिलच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार करता जे पदरात पडेल ते अगोदर पदरात पाडून घेण्याचा आता सर्वच संघटनांचा प्रयत्न आहेत. त्यामुळे दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या पुढाकाराला या 21 संघटना कसा प्रतिसाद देतात, हे 2 एप्रिलला दुपारी दोन वाजताच समजेल.

You might also like
Comments
Loading...