रावतेंविरोधात फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन

Sena-minister

सांगली : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला चांगलंचं महागात पडलं असून मनातील रोष सोशल मीडियावर व्यक्त करणाऱ्या कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. शरद जंगम असं या कर्मचाऱ्याचं नाव असून या कर्मचाऱ्यावर विभागीय नियंत्रकांनी निलंबनाची कारवाई केली.

शरद जंगम सांगलीच्या इस्लामपूर डेपोमध्ये वर्कशॉप मेकॅनिक म्हणून काम करतात. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही, लिहिला की फेकला.. असा टोमणाही या पोस्टमध्ये मारला होता तसेच हे महामंडळ चालवता येत नसेल तर चालते व्हा, अशा आशयाचा मजकूर या कर्मचाऱ्याने फेसबुकवर लिहिला होता.

काय आहे फेसबुक पोस्ट?

मी शरद जंगम
इस्लामपूर आगार
महामंडळाचे अध्यक्ष श्री रावते
यांना खुले आव्हान देतो की एकदा कामगारांच्या समोर या आणि
आपली भूमिका स्पष्ट करा…
हे महामंडळ जर नीट चालवता येत नसेल आणि
कामगारांना त्यांच्या हक्काची वेतनवाढ देता येत नसेल
तर..
चालते व्हा…
कामगार शक्तीचा अंत बघू नका..
आणखी एक गोष्ट आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरणारे
नाही.. लिहिला की फेकला. 

दरम्यान, सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या व्यक्त होण्याचं माध्यम आहे. मात्र महामंडळाच्या हितास बाधक मजकूर सोशल मीडियावर लिहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीतील तरतुदीनुसार चौकशीसाठी जंगम यांना निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबनाचं पत्र

Screenshot (1) nilamban aadesh