महाराष्ट्र बंदचा लालपरीला फटका, २० कोटी रुपयांचं झाल नुकसान

आंदोलनात सलग दोन दिवस एसटीच्या 217 बसेसची मोडतोड झाली

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा प्रकरणामुळे ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता या महाराष्ट्र बंदचा एसटीला जोरदार फटका बसला आहे. महाराष्ट्र बंदमुळे एसटीला तब्बल 20 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. आर्थिक नुकसान झालं असलं तरी, आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत एसटीचं झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे.

आंदोलनाच्या दरम्यान सलग दोन दिवस एसटीच्या 217 बसेसची मोडतोड झाली. त्याचे सुमारे 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच या बंद काळात 250 आगारांपैकी 213 आगारक्षेत्रीतील बहुतांश एसटीची वाहतूक ठप्प झाल्यामुळे 19 कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे या आंदोलनाचा एसटी महामंडळाला देखील मोठ्या प्रमाणात नुक्सः सहन करावे लागले आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...