एसटी चालकांनी बसस्थानकाच्या गेटवर चढुन केले आंदोलन

उस्मानाबाद : बसस्थानकाभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे बात गाडी वळवणे आणि लावणेही अवघड झाल्याने वैतागलेल्या एसटी चालकांनी चक्‍क बसस्थानकाच्या गेटवर चढुन आंदोलन केल्याची घटना उमरगा येथे घडली हे आंदोलन तब्बल तीन तास चालले.राष्ट्रीय महामार्ग दहावर असलेल्या उमरगा बसस्थानकावर दक्षिणेकडे ये जा करणा-या सगळया गाडया थांबतात हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने मुंबई,शिर्डी-हैद्राबाम,गुलबर्गा आदी गाडयांची तसेच लातुरला येजा करणा-या गाडयांची वर्दळ असते. मात्र बसस्थानकाभोवती असलेल्या अतिक्रमणांमुळे गाडी वळवणे आणि लावणेही अवघड जात असल्याने उमरगा नगरपालिका आणि एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.

You might also like
Comments
Loading...