दहावीचा निकाल जाहीर

पुणे : यंदा राज्यभरातून सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर होत असून, निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून (९ जून) विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल. यंदा राज्यभरातून सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

bagdure

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ४ लाख १४ हजार ९१४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९९ हजार २६२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

You might also like
Comments
Loading...