fbpx

असा पाहा दहावीचा निकाल

students

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) आहे. या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. हा निकाल mahresult.nic.in यासह इतर वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

निकालासाठीची संकेतस्थळे

mahresult.nic.in

maharashtraeducation.com

दहावीचा निकाल कसा पाहाल?

दहावीचा निकाल पाहताना तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा. जेव्हा तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर जाल, तेव्हा तिथे परीक्षा क्रमांक टाईप करावा लागले. कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. नंतर आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा.