fbpx

दहावी निकाल जाहीर : कोकण विभागाची बाजी; यशाची टक्केवारी घसरली!

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (ता.८) जाहीर झाला. दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा ८८.३८ टक्के निकाल लागला. दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग राहिला. कोल्हापूर विभागाचा ८२.४८ टक्के लागला आहे. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. नेहमीप्रमाणे निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के. निकालात तब्बल १२ टक्के घट. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे गुणफुगवटा आटला आहे अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

निकालासाठीची संकेतस्थळे

mahresult.nic.in

maharashtraeducation.com

दहावीचा निकाल कसा पाहाल?

दहावीचा निकाल पाहताना तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा. जेव्हा तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर जाल, तेव्हा तिथे परीक्षा क्रमांक टाईप करावा लागले. कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. नंतर आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा.