वडीलांचे प्रेत घरी असताना तिने दिला दहावीचा पेपर ; मिळवले उत्तुंग यश

खडतर मेहनत घेऊन दहावी -बारावीच्या परीक्षेत यश मिळवल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो मात्र जन्मदात्या पित्याचे निधन झाले  असताना खचून न जाता दहावीच्या  परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याने  काजल सर्वांच्या कौतुकास पात्र बनली आहे
          काजलआत्माराम बंडगर  हि  करमाळा तालुक्यातील  सालसे या गावातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थीनी . वर्षभर अतिशय मेहनत करून तिने दहावीची परीक्षेची तयारी केली.मात्र परिक्षेच्या कालावधीतच तिच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले मात्र सकाळी साडे आठ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली . हि घटना समजताच काजलला प्रचंड मानसिक धक्का बसला परंतु तिने स्वतः ला सावरले .आपण शिक्षण घेऊन मोठं व्हावं चांगल्या मार्काने पास व्हावं हि वडीलांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी तिने वडीलांच्या  निधनाचे दुख बाजुला ठेवुन आपल्या वडीलांचे  अंत्यदर्शन घेऊन  त्या दिवशीचा पेपर दिला तसेच संपूर्ण परीक्षा मोठ्या धैर्याने दिली .या कठीण काळात काजलच्या शिक्षकांनी काजलचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.
नुकतेच दहावीचे रिझल्ट्स जाहीर झाले आणि वर्षभर केलेल्या मेहनतीचं आणि वडिलांच्या निधनानंतर दाखवलेल्या धैर्याचं फळ काजलला मिळालं  तब्बल 87.80 % गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला.काजलचे वडील आज हे तीच उत्तुंग यश पहायला या जगात नाहीत मात्र असते तर नक्कीच लेकीच्या मिळवलेल्या यशाचा आनंद गगनात मावला नसता.