‘मुखडा आणि मुखवटा यातील फरक लक्षात घ्यायला हवा’- कौशिकी चक्रवर्ती

Kaushiki Chakrawarti speaking in Antaranga-1

पुणे : ”गायन मैफलींमध्ये आम्ही कलाकार चांगले कपडे, दागिने परिधान करतो. चेहऱ्यावर ‘मेकअप’ देखील असतो. पण त्याच्या आतला माणूस महत्त्वाचा असतो. झाडाची मुळे मजबूत असतील तरच झाड मोठे होऊ शकते. कलाकाराचेही तसेच आहे. ‘मुखडा’ आणि ‘मुखवटा’ यातील फरक आपण लक्षात घ्यायला हवा,” असे मत पतियाळा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आणि अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या व कन्या कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित केलेल्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील ‘अंतरंग’ या कार्यक्रमात आज श्रीनिवास जोशी यांनी कौशिकी यांची मुलाखत घेतली. या वेळी त्या बोलत होत्या. ”रागसंगीत गायनाच्या तयारीसाठी १५ ते २० वर्षे मोबाईल बाजूला ठेवून प्रामाणिकपणे रियाज करणे आवश्यक असते. साधकाची गायनक्षमता कितीही चांगली असली तरी या रियाजाला ‘शॉर्टकट’ नसतो. मी घरात वर्षानुवर्षे बाबांना तासंतास रियाज करताना पाहिले. म्हणून हे शक्य आहे हे मला पटले. त्या रियाजामुळेच मी गाऊ शकते,” असे कौशिकी यांनी सांगितले.

Loading...

”हल्ली मुले प्रश्न खूप विचारतात. नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारणे चांगले आहे. परंतु केवळ विरोधासाठी विरोध म्हणून प्रश्न विचारू नयेत. आधी गुरू काय सांगतात ते ऐका. एखादी गोष्ट आपल्याला पटते की नाही हे ठरवण्यासाठी आधी समोरच्याचे ऐकून घेणे आवश्यक असते,” असे मत कौशिकी यांनी व्यक्त केले.

आपल्या वडिलांचे गुरू, आपले गुरू आणि पतियाळा घराण्याच्या वैशिष्ट्यांविषयीही कौशिकी भरभरून बोलल्या. कोलकात्याच्या ‘संगीत रीसर्च अकादमी’त शिकताना मोठमोठ्या कलाकारांकडून शिकण्याची संधी मिळाली, शोभा गुर्टू यांच्याकडून शिकण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

”मी पूर्वीही अनेकदा वडिलांबरोबर पुण्यात आले होते आणि गायलेही होते. परंतु मी फारशी कुणाच्या लक्षात राहिले नाही याचे मला फार वाईट वाटत असे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असे होते, परंतु त्यातूनच पुढच्या वेळी अधिक चांगले गायला हवे, अशी प्रेरणा मिळते,” असे सांगत कौशिकी यांनी ‘सवाई गंधर्व’ महोत्सवात पहिल्यांदा गायल्याची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या,”एके दिवशी मला एक दूरध्वनी आला आणि पलीकडून एक प्रभावी आवाज ऐकू आला- ‘मी भीमसेन जोशी बोलतो आहे… पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव होतो, माहीत आहे ना?…,’ स्वप्ने पाहणाऱ्या आणि दरवर्षी ‘सवाई’च्या तारखा लक्षात ठेवणाऱ्या मला त्यांच्याशी काय बोलावे हे देखील सुचले नाही. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझी अवस्था आणखी वाईट झाली. माझ्याआधी पं. शिवकुमार शर्मा यांचे सादरीकरण होते आणि माझ्यानंतर पं. जसराज यांचे गायन होणार होते. मी थरथर कापत मंचावर गेले, तर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत असे दृष्य होते. मी तसेच गाणे सुरू केले आणि काहीच वेळात प्रेक्षक पुन्हा आत येताना दिसू लागले. माझे स्वप्न साकार झाल्याची ती भावना कधीच विसरता येणार नाही.”

याच दिवशी झालेल्या ‘षड्ज’ या कार्यक्रमात भास्कर राव दिग्दर्शित ‘म्युझिक ऑफ इंडिया’ (इन्स्ट्रुमेंटल), प्रमोद पाटी दिग्दर्शित ‘रवी शंकर’आणि एस. बी. नायमपल्ली दिग्दर्शित ‘पं. विष्णू दिगंबर पलुसकर’ हे लघुपट दाखवण्यात आले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला