मुंबई : श्रीलंका क्रिकेट संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू चमिका करुणारत्ने याने भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, श्रीलंका सध्या वाईट टप्प्यातून जात आहे आणि या वाईट परिस्थितीत भारत आम्हाला खूप मदत करत आहे. भारत हा आपल्या भावासारखा आहे, असेही चमिका करुणारत्नेने म्हटले आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती सध्या खूपच वाईट आहे. महागाईमुळे देशात जनतेत सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. राजकीय गोंधळामुळे श्रीलंकेत इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
भारत आम्हाला कठीण परिस्थितीत खूप मदत करत आहे
श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमिका करुणारत्नेने म्हटले आहे की, ‘संकटाच्या या काळात भारत त्याला खूप मदत करत आहे. एएनआयशी बोलताना त्याने भारताचे आभार मानले आहेत. भारत हा आपल्या भावासारखा देश आहे. भारत आपल्याला खूप मदत करत आहे. मी त्यांचे खूप आभार मानतो. आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. संकटकाळी ते आम्हाला मदत करत आहेत. यासाठी भारताचे मनःपूर्वक आभार. त्यांनी दिलेल्या प्रत्येक मदतीसाठी त्यांचे धन्यवाद. आम्ही हळूहळू या परिस्थितीतून लवकरच चांगले होऊ.
चमिका करुणारत्नेला नुकतेच पेट्रोल भरण्यासाठी लांबलचक रांगेत उभे राहावे लागले होते. करुणारत्ने म्हणाला की, पेट्रोलच्या तुटवड्यामुळे तो सराव सत्राला उपस्थित राहू शकत नाही. इंधनाच्या तुटवड्यामुळे अधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवली आहेत. तो म्हणाला की, दोन दिवस लांब रांगेत थांबल्यानंतर सुदैवाने मला पेट्रोल मिळाले. पेट्रोलच्या प्रचंड तुटवड्यामुळे मी माझ्या क्रिकेटच्या सरावासाठीही जाऊ शकत नाही. अशा कठीण परिस्थितीतही श्रीलंकेत क्रिकेटचे आयोजन केले जात आहे.
India is like a brother country & they are helping us a lot. I thank them so much. We have problems. They are supporting us when we are struggling. Thank you so much for that. Thank you for everything. We will get better and better: Sri Lankan cricketer Chamika Karunaratne to ANI pic.twitter.com/NDvXq1pj88
— ANI (@ANI) July 16, 2022
चमिका करुणारत्नेने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एएनआय या वृत्तसंस्थेशी विशेष संवाद साधताना त्याने देशातील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. इंधनाच्या संकटावर करुणारत्ने म्हणाला की, “२ दिवस लांब रांगेत थांबल्यानंतर मी नशीबवान आहे की मला पेट्रोल मिळाले. सध्या देशात इंधनाचे मोठे संकट आहे. माझा यातच सगळा वेळ जातो. त्यामुळे मला सरावाला जाता येत नाही. १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही इंधन आणि आर्थिक संकट पाहिलेले नाही. परिस्थिती अशी आहे की देशातील केवळ १० टक्के लोकांनाच इंधन मिळत आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli : विराट कोहली एक महिन्याच्या ब्रेकमध्ये भारताबाहेर फॅमिलीसोबत ‘या’ शहरात राहणार
- Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी NDA कडून जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा
- Virat kohli : बाबर आझमने केलेल्या समर्थनार्थ ट्विटला विराट कोहलीने दिले ‘असे’ उत्तर, म्हणाला…
- kishori Pednekar | उद्धव ठाकरे यांचे निर्णय चुकीचे असल्याचं भासवलं जातंय- किशोरी पेडणेकर
- IND vs ENG : ख्रिस गेलनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरेल जगातील पहिला फलंदाज; वाचा!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<