श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे जेऊर येथे उत्सहात स्वागत

करमाळा- आता जावे पंढरीसी | दंडवत विठोबासी ||
जेथे चंद्रभागतिरी | आम्ही नाचो पंढरपुरी ||
या संत तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे विठ्ठल भेटीच्या ओढीने श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर येथून पंढरीला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महारांजाची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील जेऊर येथे भक्तीमय वातावरणाततीचे आगमन झाले. जेऊर ग्रामपंचायत,तसेच जेऊर व्यापारी संघटनेच्या वतीने निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी चे स्वागत करण्यात आले.यावेळी जेऊर चे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच जेऊर परिसरातील व्यापारी संघटना, ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे पन्नास हजार वारकऱ्यांचा समावेश असलेल्या निवृत्तीनाथ महारांजाची पालखी आज जेऊर मुक्कामी राहणार असून बुधवारी सकाळी पंढरपूर कडे मार्गस्त होणार आहे. जेऊर परिसरातील नागरीकांनी तसेच प्रशासनाने जय्यत तयारी करून पालखी चे स्वागत केले.

श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर येथून आलेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्वात पुढे चौघडा त्याच्या मागे अश्व आणि वारकर्यांची दिंडी त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांचा रथ आणि त्यांच्या मागे टाळ, मृदुंगाच्या गजरात वारकरी असा शिस्तबद्ध पध्दतीने ही पालखी पंढरपूर कडे मार्गस्त होत असते.

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पुढीलप्रमाणे पंढरपूरकडे प्रवास.
१८ जुलै कंदर येथे मुक्काम.
१९ जुलै दगडी अकोला मुक्काम.
२० जुलै करकंब मुक्काम.
२१ जुलै चिंचोली मुक्काम.
२२ जुलै पंढरपूर…

 

छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे