श्रीलंकेच्या स्टार क्रिकेटपटूने कारने वृद्धाला चिरडले, पोलिसांनी केली अटक

Sri Lanka's star cricketer

नवी दिल्ली- श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसला रविवारी होरेथुदुवा येथे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या गाडीने एका व्यक्तिला चिरडल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुशल मेंडिस याला अटक केली आहे. कोलंबो शहरातील पंदौरा येथे हा अपघात झाला आहे.

25 वर्षीय मेंडिसने श्रीलंकेसाठी 44 कसोटी सामने तर 76 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो संघाचा विकेटकिपर आहे. मेंडिसला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून तिथे त्याचे पुढिल भविष्य ठरेल.

कोलंबोपासून 30 किमी दूर असलेल्या पानादुरा शहरात आज सकाळी (रविवार) हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी 25 वर्षीय कुसल कार चालवत असल्याची माहिती आहे. 64 वर्षीय वृद्ध व्यक्ती सायकल चालवत होती. कुसलच्या कारने चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कुसल पसार झाला, मात्र पोलिसांनी त्याला काही तासातच बेड्या ठोकल्या.

कुसल मेंडिस हा श्रीलंका क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. मेंडिसने श्रीलंकेकडून 44 कसोटी सामन्यांमध्ये 2995 धावा केल्या आहेत. तर 76 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 2167 धावा रचल्या आहेत. कुसलने 26 टी20 सामन्यांमध्ये 484 धावाही ठोकल्या आहेत.

मेरे लिए दुआ करें…’ पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी कोरोना पॉझिटिव्ह

मराठवाड्यात कोरोनाचे थैमान, झपाट्याने वाढतेय रुग्णांची संख्या

मोदींच्या ‘त्या’ एका वाक्यानेच चिन्यांचा तिळपापड, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया