श्रीलंकेची टीम जिकांयचं विसरली आहे : मुरलीधरन

murlidhan

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

पराभवामुळे श्रीलंकेनं भारताविरुद्धची वन-डे मालिका देखील गमावली. श्रीलंका टीमच्या सध्याच्या कामगिरीवर महान स्पिनर मुथैय्या मुरलीधरन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही टीम मॅच जिंकणेच विसरली आहे. देशाच्या खेळाची सध्या बिकट अवस्था आहे, असं मत त्याने व्यक्त केलं आहे.

क्रिकइन्फो’शी बोलताना मुरलीधरन म्हणाला, ‘श्रीलंकेची टीम जिकांयचं कसं हे विसरली आहे. चुरशीच्या प्रसंगात काय केले पाहिजे हे त्यांना माहिती नाही. लेग स्पिनर वानिंदू हसरंगानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. भारताची अवस्था 7 आऊट 193 अशी असताना शनाकानं त्याचे ओव्हर्स शिल्लक ठेवले. ही त्याची मोठी चूक होती.

श्रीलंकेनं पहिल्या 10-15 ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतल्या तर भारताला संघर्ष करावा लागेल, हे मी यापूर्वीच सांगितले होते. भूवनेश्वर कुमार आणि दीपक चहरनं जोरदार खेळी करवून विजय मिळवून दिला. श्रीलंकेच्या कॅप्टननं त्यांची विकेट घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. असेही मुरलीधन यावेळी म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP