अश्विन व जडेजाच्या फिरकीसमोर लंकेचा डाव गडगडला फॉलोऑनची नामुष्की

r ashwin
वेबटीम : भारत व श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपली हुकूमत गाजवली.श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 183 धावात आटोपला.भारतातर्फे अश्विनने कसोटीतील 5 विकेट घेण्याचा पराक्रम 26 व्या वेळा करून हरभजन सिंगला मागे टाकले.अश्विनच्या समोर आता फक्त अनिल कुंबळे आहे.जडेजा शमी यांनीही प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर उमेश यादवने 1 विकेट घेतली.जडेजाने 2 विकेट घेत अश्विननंतर वेगवान 150 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.